HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्रशांत देसाई सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहेत : माजी खा. निवेदिता माने

प्रशांत देसाई सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहेत :  माजी खा. निवेदिता माने

कोल्हापूर : देशाचे भविष्य हे तरुण पिढी असते आणि सक्षम तरुण घडविण्यासाठी विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर आदर्श संस्कार व्हावे लागतात. हे विद्यार्थी आणि परिणामी संपूर्ण देश घडविण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात, त्यामुळे राष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. असेच हजारो सक्षम, सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचे कार्य सातत्याने गेली 24 वर्षे प्राचार्य प्रशांत देसाई करत आहेत. असे गौरव उद्गार माजी खासदार निवेदिता माने यांनी काढले. ईगल फाउंडेशन सांगली व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने चाटे कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य प्रशांत देसाई यांना राज्यस्तरीय" शिक्षण रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. 

अतिग्रे येथील संजय घोडावत शैक्षणिक संकुलामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उद्योजक एन.सी. संघवी ,सनदी लेखापाल डॉ. शंकर अदानी, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुडलकर, ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य देसाई यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.