कुर ते मिणचे 1 ते 17 कि.मी चे अस्तरीकरण कामास 21 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर:- आम. प्रकाश आबिटकर

कुर ते मिणचे 1 ते 17 कि.मी चे अस्तरीकरण कामास 21 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर:- आम. प्रकाश आबिटकर

कुर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील कुर ते मिणचे कालवा कि.मी. 1 ते 17 चे अस्तरीकरण करण्याच्या कामास कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून 21 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. 

दुधगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याअंतर्गत पोटकालवा असणाऱ्या कुर ते मिणचे बुद्रुक 1 ते 17 कि.मी. मध्ये पाण्याचा विसर्ग सध्या पाट-पाणी पध्दतीने सुरु आहे. या पध्दतीमुळे मोठ्या प्रमाणात पाझर होत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारपट होत आहेत. तसेच पाण्याचे आवर्तन विहीत वेळेमध्ये पुर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांकडून सातत्याने हा कालवा अस्तरीकरण करण्याची मागणी होत होती. या मागणीनुसार आमदार प्रकाश आबिटकर यांनी सदरील अस्तरीकरणाचा प्रस्ताव कृष्णा खोर विकास महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आला. त्यास शासनाने प्रकल्पाच्या मुळ किंमतीमधून खर्च करण्यास खासबाब म्हणून मान्यता दिली असून सदरील अस्तरीकरणाच्या कामाकरीता कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या सन 2024 - 25 सालच्या प्रापण सुचीमधून 21 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरील कामाची निविदा लवकरच प्रसिध्द करण्यात येणार असून या कामाची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे त्यामुळे मिणचे खोऱ्यातील शेतकऱ्यांची अस्तरीकरणाची वर्षानुवर्षांची असलेली मागणी पुर्ण होणार आहे.