कोरे अभियांत्रिकीच्या पॉलिटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्राम उत्साहात
वारणानगर (प्रतिनिधी) : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल ,कॉम्पुटर आणि इलेक्ट्रिकल या चार विभागांतील या वर्षी नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी कोरे अभियांत्रिकीचे ईटीसी विभागप्रमुख डॉ. शरद जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य पी. आर. पाटील यांनी डॉ. शरद जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ. शरद जाधव म्हणाले की, रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक, व्यावसायिक कौशल्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कॉर्पोरेट जग गतिमान आहे आणि दररोज बऱ्याच नवीन गोष्टी घडत असतात. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनीही नवीनतम ज्ञानाने स्वत:ला अपडेट ठेवत कोणत्याही स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी तयार असले पाहिजे. प्राचार्य पी. आर. पाटील यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनावेळी पॉलीटेकनिकचे १९८ विद्यार्थी व ४० पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. एस. बी. मोहिते व आभार प्रदर्शन प्रा. ए. एन. गुरव यांनी केले. श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आ. डॉ. विनयरावजी कोरे व वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कर्जीनी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.