3 लाख 61 हजार लुटणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी 24 तासात केले जेरबंद
कोल्हापूर (प्रतिनिधी) : बचत गटाची रक्कम घेऊन जाणाऱ्या आकाश जगन्नाथ शिंदे मु. पोस्ट माले, तालुका हातकणंगले( वय 26) यांना हॉटेल लिशा जवळ अडवून “राजेंद्र नगर येथे येऊन दादागिरी करतोस काय” असे धमकावत त्याच्याकडील 3 लाख 61 हजार रुपयांची रक्कम लुटणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी केले 24 तासांच्या आत जेरबंद.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
5 डिसेंबर रोजी आकाश जगन्नाथ शिंदे हे मोटरसायकल वरून नोकरी करत असलेल्या भारत फायनान्स कंपनीमध्ये रक्कम भरण्यासाठी चालले होते. यावेळी दरोडेखोरांनी त्यांना अडवून त्याच्याकडून 3 लाख 61 हजार ची रक्कम लुटली तसेच सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीनही हिसकावले याबाबत राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला होता त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यानुसार संगीता शिंदे या महिलेचा मुलगा सनी बाबसाहेब शिंदे यांनी या दरोड्याचा कट रचल्याचे लक्षात आले पोलीसांनी सनी शिंदे यास ताब्यात घेतले असता त्याचा साथीदार किरण स्वामी वैदू वय 31 रा. राजेंद्र नगर साळोखे पार्क , अभिजीत अनिल आवळे जवाहर नगर ,विजय सुरेश कदम वय 20 जवाहर नगर ,रोहित सुरेश कदम वय 21 रा. जवाहर नगर यांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व 2 लाख 50 हजार रुपये रोख तसेच 20 हजार किमतीचे मोबाईल असा 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे अमलदार वैभव पाटील तसेच गजानन गुरव संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील महेश कोरवी विशाल खराडे विलास किरोळकर यांनी ही कारवाई केली. घडलेल्या गुन्ह्याचा 24 तासात पोलिसांनी छडा लावल्याने सर्वत्र कौतुक होत आहे