दि प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि. कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण हळदकर यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी रामदास झेंडे यांची फेर निवड

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि. कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण हळदकर यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी रामदास झेंडे यांची फेर निवड

कोल्हापूर: दि प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि. कोल्हापूर या बँकेची संचालक मंडळाची सभा बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरिता डॉ. प्रिया दळणर उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या सभेमध्ये बाळकृष्ण हळदकर, तालुका भुदरगड यांचे नांव राजेंद्रकुमार पाटील यांनी सुचविले तर त्यास शिवाजी रोडे-पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी रामदास झेंडे, तालुका पन्हाळा यांचे नांव शिवाजी बोलके यांनी सुचविले तर त्यास वर्षा केनवडे यांनी अनुमोदन दिले.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचीही नामनिर्देशन प्रत्रिका नसल्याने अध्यासी अधिकारी डॉ. प्रिया दळणर यांनी बाळकृष्ण हळदकर यांची अध्यक्ष तर रामदाम झेंडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेचे जाहीर केले.

सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष बाळकृष्ण हळदकर यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उनतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

सदर सभेस मावळते अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर तसेच संचालक सर्वश्री राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, अर्जुन पाटील, एस.व्ही. पाटील, शिवाजी रोडे-पाटील, नंदकुमार बाईगडे, अमर बरुटे, शिवाजी बोलके, सुरेश कोळी, गौतम बर्धन, गजानन कांबळे, सौ. पद्मजा मेडे,  वर्षा केनवडे तसेच मुकाणू समितीचे सर्वची जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तोंदकर, रघुनाथ खोत, प्रकाश खोत, संजय कुईकर, आनंदराव जाधव, रावसाहेब देसाई, जयवंत पाटील, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सन्माननीय सभासद तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया दळणर यांनी सभा खेळीमेळीत व शांततेत पार पाडल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानून निवडीचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदनपर संचालक व मुकाणू समितीची भाषणे झाली.