कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर ग्रुप तर्फे तरुण गिर्यारोहकांनी केली पन्हाळा गडाची स्वच्छता

कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर ग्रुप तर्फे तरुण गिर्यारोहकांनी केली पन्हाळा गडाची स्वच्छता

कोल्हापूर : महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनानिमित्त कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर या गिर्यारोही ग्रुप तर्फे पन्हाळा गडावरील अंधारबाव परिसर आणि ऐतिहासिक तटबंदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तटबंदीवर वाढलेली झाडे - झुडपे आणि वेली काढून टाकत ऐतिहासिक बांधकामाची स्वच्छता तसेच पर्यटकांनी तटबंदी वरून खाली फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा अशी स्वच्छता केली. अंधारबाव परिसराची स्वच्छता मोहीम अत्यंत अवघड अशा उंचीवर करायची असल्याने गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या तंत्राचा व साहित्याचा वापर करून, उंचीवरील ही स्वच्छता मोहीम करण्यात आली. ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण करणाऱ्या वनस्पती मुळासहित काढण्यात आल्या. तटबंदीच्या स्वच्छतेमुळे ऐतिहासिक वास्तू  उजळल्या आहेत. 

       

यावेळी गिर्यारोहक अनिकेत जुगदार, निखिल यादव, बाबासाहेब जाधव, शिवतेज पाटील, रोहन भंडारी, तुषार पाटील, सुमित बिरमबुले, सार्थक पाटील, प्रशांत पाटील, अखिलेश जाधव, रजत घाटगे, छायाचित्रकार शादाब शेख, प्रेरणा जाधव, श्रीराज गायकवाड, आकाश साळोखे,स्वप्नील माने, सुरज साळुंखे, सचिन स्वखिंडे, सौरभ काकडे, सुरज अडगणी, श्रीवर्धन जाधव, स्नेहा जाधव, या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेत प्रमोद पाटील, विनोद कंबोज, रायडर्स फाउंडेशन, समिट एडवेंचर, सफरनामा ट्रेकिंग, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांचे सहकार्य लाभले.