गारगोटीतील गोकुळच्या संपर्क सभेत वाद नाही- तानाजी जाधव

गारगोटीतील गोकुळच्या संपर्क सभेत वाद नाही- तानाजी जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधि) : गोकुळच्या गारगोटी येथील संपर्क सभेत हमरीतुमरी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये आपल्या तसेच आ. प्रकाश आबिटकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, असा कोणताही प्रकार झालेला नसल्याचे पत्रक गंगापूर (ता. भुदरगड) येथे महादेवराव महाडिक दूध संस्थेचे तानाजीराव जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आबिटकर हे सत्तारूढ आघाडीचे नेते असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

महादेवराव महाडिक दूध संस्थेला आलेल्या काही दुय्यम प्रतीच्या पावत्यांबाबत आपण प्रश्न उपस्थित केला. त्याचे निराकरणही झाले. त्याचवेळी तालुक्यातील अन्य एका दूध संस्थेच्या प्रतिनिधींनीही अशाच आशयाच्या तक्रारी केल्या. मात्र, याप्रकरणी वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केल्याचे दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी संबंधित संस्था प्रतिनिधींनीही आढेवेढे घेत ते मान्य केले. हा अपवाद वगळता संपर्क सभा दोन ते अडीच तास खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे जाधव यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. भुदरगड तालुक्याला गोकुळमध्ये प्रतिनिधित्व नव्हते, त्या काळात अरुण डोंगळे यांनी तालुक्याचे पालक संचालक म्हणून काम केल्याचा उल्लेख पत्रकात केला आहे.