वीज कंत्राटी कामगारांचे 9 जुलै रोजी आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही या मुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ दि 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने करणार आहे याची नोटीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ऊर्जा मंत्री, कामगार मंत्री , व वीज कंपनी चे प्रशासन यांना नोटीस दिली आहे अशी माहिती महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.
27 जून2024 रोजी सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी "सरकार जगाओ" आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व मंत्री आमदार व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर विधी मंडळात आवाज उठवण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच या आंदोलनामध्ये विविध मागणी करणार असल्याचे खरात त्यांनी सांगितले.
यामुळे 9 जुलै 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन मध्ये वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवहान महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले.