कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रकल्प शंभर टक्के भरले
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वाढत आहे. दरम्यान घटप्रभा धरण, जांबरे, कोदे लघु पाटबंधारे हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.
सध्या राधानगरी 88 टक्के, दुधगंगा 47 टक्के, वारणा 74 टक्के, तुळशी 45 टक्के, कासारी 79 टक्के, कडवी 81 टक्के, कुंभी 80 टक्के आदी धरणांची वाटचाल शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.