कोल्हापूर विभागाच्या 272 बस फेऱ्या रद्द

कोल्हापूर विभागाच्या 272 बस फेऱ्या रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामूळं नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होतीय. यामुळं अनेक रस्ते वाह्तुकीसाठी बंद झाल्यानं मंगळवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला कोल्हापूर विभागाच्या 272 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. काही ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू असून कोल्हापूर विभागाचं 3 लाख 74 हजार 242 रुपयाचं इतकं उत्पन्न बुडालंय.

आठवडाभरापासून जिल्हयात दमदार पाऊस सुरुय. ठिकठिकाणच्या ओढया नाल्यांना पूर आलाय. प्रवासी नागरिक, विद्यार्थी, महिलांच्या सुरक्षतेखाली कोल्हापूर- गगनबावडा, कोल्हापूर - रत्नागिरी यासह 19 मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आलीय. एसटीच्या कोल्हापूर आगाराच्या - 4, संभाजीनगर - 52, गडहिंग्लजच्या - 60, इचलकरंजी - 30, गारगोटी - 16, मलकापूर - 15 ,कुरुंदवाड- 5, कागल -2, राधानगरी -16, गगनबावडा -15, चंदगड -57, आजरा - 8 अशा मिळून 272 फेऱ्या रद्द करण्यात आलेत. या मार्गावरील दिवसभराचा 12 हजार 560 किलोमीटरचा प्रवास रद्द झालाय. तर 3 लाख 74 हजार 242 रुपयांचे उत्पन्न बुडालं. पाऊस असाच संततधार सुरु राहिल्यास यापेक्षा अधिक फेऱ्या रद्द होवू शकतात असा अंदाज एसटी विभागाकडून वर्तवला गेलाय.