पश्चिम महाराष्ट्रातील पुर परिस्थितीचे व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेस कोरे अभियांत्रिकीत प्रारंभ

पश्चिम महाराष्ट्रातील पुर परिस्थितीचे व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेस कोरे अभियांत्रिकीत प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी: तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमास) अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिीअरिंग विभागामार्फत व एआयसीटीई - वाणी योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पुर परिस्थितीचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेस कोरे अभियांत्रिकीत प्रारंभ झाला. यासाठी वेगवेगळ्या संस्थांमधून ८० हुन अधिक प्राध्यापकांनी व संशोधकांनी सहभाग नोंदवला आहे.एआयसीटीई वाणी योजनेअंतर्गत कार्यशाळेसाठी निधी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील कोरे अभियांत्रिकी एकमेव खाजगी महाविद्यालय आहे.

 या कार्यशाळेचे उद्घाटन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी व कोल्हापूर आर्किटेक्ट आणि इंजिनिअर असोशियन चे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डीन, डॉ. एस. एम. पिसे, प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने उपस्थित होते. नियोजनासाठी श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ विनय रावजी कोरे यांचे सहकार्य लाभले.प्रास्तविक व स्वागत, कार्यशाळेचे समन्वयक, सिव्हील विभागप्रमुख, डॉ. डी. एम. पाटील, सह समन्वयक प्रा. ए. आर. चौगुले यांनी आभार मानले. प्रा. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेत डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अजय कोराणे, डॉ. अभिजीत झेंडे, डॉ. धनराज पाटील डॉ. एम. बी. चौगुले, डॉ. एस. के. पाटील, डॉ. राहुल काजवे, श्री. अजित सावडी, डॉ. धनराज पाटील, इंजि. अभिजित चव्हाण, श्री. बी. व्यंकटेश मार्गदर्शन करणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे आपत्ती व्यवस्थापनासाठी अनुभव, सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपत्ती दरम्यान धोरणे आणि आव्हाने यावर चर्चा करणे, आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.