कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोठी कारवाई

कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोठी कारवाई
दोन मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

कोल्हापूर / प्रतिनिधी


स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून दोन मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली. देवराज मुरलीधर लोंढे आणि आदित्य संजय लोंढे अशी मोटरसायकल चोरणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

मोटरसायकल चोरणारे दोघे कोल्हापूर-हातकणंगले रस्त्यावरील अतिग्रे गावाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून देवराज लोंढे आणि आदित्य लोंढे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आदित्य लोंढे याच्या घरात आठ मोटरसायकल मिळल्या. त्यांनी गेल्या दीड वर्षात पेठ वडगाव, गांधीनगर आणि हिंजवडी पुणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, पोलीस अंमलदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, अनिल पास्ते, आयुब गडकरी, राजू कांबळे, बालाजी पाटील, नवनाथ कदम, संदीप गायकवाड यांनी कारवाईत भाग घेतला.