डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी ..!

कोल्हापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांचे शुभहस्ते साजरी करण्यात आली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता माधूरी परिट, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सागांवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे तसेच राज्याचे कास्ट्राईब महासंघाचे सचिव नामदेवराव कांबळे, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.