खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, म्हणाले काही दिवसांनी कराड...

मुंबई : धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक कराडला रुग्णालयात सवलती देण्यात येत आहेत असं सुरेश धस सांगत आहेत. अंजली दमानिया यांचा संघपरिवाराशी संबंध आहेत. त्यामुळे आज फैसला काहीच होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
बीडमधील दहशताविरोधात सुरेश धसांचं तांडव सुरू आहे. या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. तरीही कराड रूग्णालयात आहेत, त्यांचं काय दुखत आहे माहित नाही. त्यांच्यासाठी मजला रिकामा केला असून इतर सवलती त्यांना मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिसत नाही का?धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक कराडला रुग्णालयात सवलती देण्यात येत आहेत असं सुरेश धस सांगत आहेत. अंजली दमानिया यांचा संघपरिवाराशी संबंध आहेत. त्यामुळे आज फैसला काहीच होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील.
पैसे कुठूनही आणा पण केलेल्या घोषणा...
नीती आयोग आणि शिखर बँक यांनी जी माहिती समोर आणली आहे त्यामुळे निवडणुकीआधी रेवडी योजना जाहीर केल्यात त्यामुळे महाराष्ट्र राज्यावर ४५ हजार कोटींचा खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे, जाहीरनाम्यात घोषणा केली आहे, ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलू नका, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची ही भुमिका आहे. लाडक्या बहिणीबरोबरच कर्जमाफी करावी लागेल हे तुमचं वचन आहे. त्यामुळे आता पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून, अदानींच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तु्म्ही ठरवायचं. पण ज्या घोषणा तुम्ही केल्यात त्या पूर्ण कराव्या लागणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय.