HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल - आ. सतेज पाटील

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल - आ. सतेज पाटील

कोल्हापूर - महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती, गोकुळ मध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. त्यामुळे सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते. फॉर्मुलानुसार अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती. सामंजशाने हा प्रश्न सुटेल असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. 

गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी अरुण डोंगळे तयार नसतानाच, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेचे आ. सतेज पाटील यांनी यावर भाष्य करत या सर्वातून मार्ग निघेल. अरुण डोंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ येणार नाही. गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. असे मला वाटत नाही, हे जिल्ह्याच राजकारण आहे. फॉर्मुलानुसार दोन दोन वर्ष ठरले होते 15 मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा. अशी अपेक्षा होती अजून ही आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती, गोकुळ मध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते असेही आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

खा. धनंजय महाडिक यांनीही गोकुळच्या अध्यक्षपदावरून आ. सतेज पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर खा. महाडीक यांचे गोकुळ संदर्भात ज्ञान कमी असल्याची टीका आ. सतेज पाटील यांनी केली. भीमा कारखान्याचे क्रशिंग किती झाले आहे हे त्यांनी सांगितले तर कोल्हापुरातील सहकाराला त्याचं मार्गदर्शन होईल. असा टोलाही आ. सतेज पाटील यांनी लगावला. कदाचित अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल, मात्र लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वासही आ. सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक आम्ही घेणार आहोत. प्राथमिक चर्चा सुरू आहेत. जिथे महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तेथे आम्ही एकत्र असणार आहोत. पावसाळ्याचे वातावरण असल्याने त्याच नियोजन कसे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित करत निवडणूक आयोगाला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार नसल्याचे खा धनंजय महाडिक म्हणत आहेत. मात्र धनजंय महाडिक आता खासदार झाले आहेत त्यांनी माहिती घेणे अपेक्षित असल्याचाही टोला त्यांनी लगावला. केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात तिन राज्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. कृष्णा लवादाने निर्णय दिलेला आहे केंद्राने त्याचा गॅजेट काढायचा आहे ते गॅजेट काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक सरकारने निधीची तरतूद केली असून जागा देखील हस्तांतरित केली आहे. मग स्थगिती कशाची आहे. याची खासदारांनी माहिती घ्यावी ते दर आठवड्याला दिल्लीत जातात असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक पाठवून दिले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात अहवाल आला आहे. रत्नागिरीचा कारभार कसा सोपा होईल याचा प्रयत्न करणार आहोत. राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा तिथे ताकद वाढली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद कशी वाढेल याचा आम्ही प्रयत्न करतोय असेही त्यांनी सांगितले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.