HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

खोटं बोल पण रेटून बोल हीच महाडिकांची वृत्ती : राजू यादव

खोटं बोल पण रेटून बोल हीच महाडिकांची वृत्ती : राजू यादव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतानाचा फोटो कोणाकडे आहे का? अशी विचारणा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक करत आहेत. मात्र, कसबा बावडा येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतानाचे खासदार राहुल गांधी यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे ते तोंडावर पडले आहेत. खोटे बोल पण रेटून बोल हीच महाडिकांची वृत्ती असून त्यांना खोटे बोलण्याबद्दलचा पुरस्कार द्यावा लागेल असा टोला शिवसेनेचे (ठाकरे गट) करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी लगावला. आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे आयोजित पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. 

 आमदार ऋतुराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पदयात्रेला सुरुवात केली. गावातून प्रमुख कॉलनीमधून काढण्यात आलेल्या या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमदार ऋतुराज पाटील यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. 

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, जनतेने नेहमीच पाटील कुटूंबावर प्रेम केले आहे. जनतेच्या या प्रेमामुळे मला आणखी बळ मिळाले असून आपले प्रेम व आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित आहे.

सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, गेल्या पाच वर्षात आ.ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करुन आमदार कसा असावा हे दाखवून दिले. 

दिनकर पोवार म्हणाले, आ.ऋतुराज पाटील सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्‍व आहे. विधायक काम करुन मतदारसंघाचा चेहरामोहरा त्यांनी बदलला असून उचगावमधून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करुया.

याप्रसंगी बाळासो मनाडे, दिपक रेडेकर, गुरु माने, किर्ती मसुटे, सुरज पाटील, महेश जाधव, अनिल यादव, राजू मल्हारी, सुभाना धनगर, सतिश भोसले, बाळासो भोसले, कावजी कदम, अशोक निगडे, जयसिंग ढेकळे, गौरी मुसळे, सुनिल यवलुजे, दत्ता यादव, संजय वतनदार, दिलीप चौगले, पांडुरंग साळोखे, अवि मोळे, संजय निगडे, सुनिल पवार, विराग करी, दिपक रेडेकर आदि उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.