खोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट - आ.सतेज पाटील

खोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट - आ.सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते हे कळत नाही. बिहार व आंध्र प्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प या दोन राज्यांसाठीच मांडला असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत तरुणांनी हिसका दाखवल्यानंतर रोजगाराच्या संधीचा खोटा आभास तयार करणारे बजेट मांडले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर दिली.

       या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने बेरोजगारांना खोटी आश्वासने तर दिलीच पण सर्वसामान्य घटकांनाही लॉलिपॉप दाखवले आहे. एनडीएमध्ये एकनाथ शिंदे सहभागी असतानाही महाराष्ट्रात एकही प्रकल्प त्यांना आणता आलेला नाही. याउलट नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः च्या राज्यासाठी लाखो कोटींची तरतूद मिळवली आहे. आधीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. त्यात अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला डावलून या राज्याचे महत्व कमी करण्याचा केंद्रातील शीर्षस्त नेत्यांचा डाव आहे. पण, राज्यातील जनता ही साप्त्नक वागणूक विसरणार नाही. जसा लोकसभेला धडा शिकावला त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्येही या दुजाभावाचे योग्य उत्तर जनता देईल. असेही आमदार पाटील म्हणाले.