HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य प्रज्वलित करते-प्रा.जयंत घेवडे

अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य प्रज्वलित करते-प्रा.जयंत घेवडे

गारगोटी प्रतिनिधी: विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते', असे प्रतिपादन इन्स्टीट्युट ऑफ सिव्हील ॲन्ड रुरल इंजिनीअरींग, गारगोटीचे प्राचार्य जयंत घेवडे यांनी केले. ते श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींग कॉलेज मार्फत आयोजित अन्वेषा 2025 या नॅशनल लेवल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

 यावेळी बोलताना प्रा.घेवडे म्हणाले की, अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची उर्मी येते. अन्वेषा 2025 सारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करत आहेत. आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एएसीओईपी) कॉलेजने हा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे असून याबद्दल त्यांनी कॉलेचे कौतुक केले. 

 यावेळी बोलताना कॉलेजचे प्राचार्य अमर चौगले म्हणाले, श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पाल (गारगोटी) मार्फत 2024-25 या शैक्षणिक वर्षात डिप्लोमा इंजीनियरिंग मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता अन्वेषा 2K25 नॅशनल लेवल इव्हेंट घेण्यात आला असल्याचे सांगितले. या उपक्रमामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल मेकिंग, क्विझ कॉम्पिटिशन व ट्रेझर हंट अशा प्रकारचे इव्हेंट घेण्यात आले. या आयोजित केलेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यासह सिमा भागातून 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच संस्थेकडून विजेते विद्यार्थ्यांना 30,000 रु. रोख बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.  

या कार्यक्रामास प्राचार्य धनाजी रेपे सर, विक्रमसिंह आबिटकर, अरविंद कदम सर, सचिन लोहार सर, धीरज देसाई, धीरज गुदगे, मनोज आळवेकर यांच्यासह प्रमुख मान्यवर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.