'गोकुळ'च्या कर्मचाऱ्यांनी जपले सामाजिक भान

'गोकुळ'च्या कर्मचाऱ्यांनी जपले सामाजिक भान

नागाव  : 'गोकुळ'च्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक भान जपत कौतुकास्पद कार्य केले आहे. गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील एका विभागाकडील कंत्राटी कर्मचारी सुनीता संताजी मोरे यांचे पती आजारी आहेत. खर्च मोठा असल्याने आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक पुणेकर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या कामाचे अनुकरण करत इतर कर्मचाऱ्यांनीही आपला खारीचा वाटा उचलला.

ही रोख स्वरूपातील आर्थिक मदत पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक पुणेकर, युनियन प्रतिनिधी निवास पाटील यांच्या हस्ते सुनीता मोरे यांना देण्यात आली.

यावेळी सहायक संकलन अधिकारी सुरेश पाटील, स्टोअरप्रमुख सुरेश पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील, पंडित पाटील, मिलिंद जोशी, सुनीता कांबळे, सुनील पाटील, रंगराव कोळेकर, चंद्रकांत बडेकर आदी उपस्थित होते.