HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय घोडावत विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थिनींना सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर व रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक..!

संजय घोडावत विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थिनींना सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर व रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक..!

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या एमबीए प्रथम वर्षाच्या रक्षा खंडेलवाल, ऋतुजा रिसवडकर, अंकित पटेल,पीयूष देशमाने, पारस टांकसाळे व ध्रुव मालदे  यांनी २८-२९ मार्च २०२५ रोजी रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, भोपाळ, मध्यप्रदेश यांनी आयोजित केलेल्या "शोध शिखर - २०२५" या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहून आपले संशोधन पेपर व प्रकल्प सादर केले. यातील विद्यार्थिनी ऋतुजा रिसवडकर आणि रक्षा खंडेलवाल यांनी ‘शोध शिखर - २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या “मद्यपान आणि महिला - समावेशक सांस्कृतिक सक्षमीकरण आणि सामाजिक शाश्वत दृष्टीकोन" या विषयावरील संशोधन पेपरला सर्वोत्कृष्ट संशोधन पेपरचा पुरस्कार आणि रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील डॉ. वि. एस. बालगावकर (सहयोगी प्राध्यापक) आणि डॉ. गिरी वाय.एल. (प्राध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयावरील संशोधनचे काम केले.

ही परिषद रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत १२ देशांमधून २७५ संशोधन प्रबंध आणि ८७ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. गिरी योगेश्वरी एल. यांच्या प्रयत्नांतून व नेतृत्वात विद्याशाखेत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण आणि वास्तव जगाचा अनुभव घेण्याची संधी वेळोवेळी दिली जाते ज्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्पर्धेत टिकण्याचे कौशल्य विकसित होईल ही काळजी घेतली जाते. या उल्लेखनीय यशा मध्ये विद्याशाखेतील विभाग प्रमुख, तसेच डॉ.बालगावकर, संपूर्ण प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मेहनत व समर्पण आहे.

या उल्लेखनीय व दैदिप्यमान यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले आणि रजिस्ट्रार डॉ. विवेक कयांदे यांनी विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाच्या संपूर्ण परिवाराकडून या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.