HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार ? चर्चांना उधाण , चंद्रहार पाटलांनी स्पष्टच सांगितलं...

चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार ? चर्चांना उधाण , चंद्रहार पाटलांनी स्पष्टच सांगितलं...

सांगली : शिवसेना (ठाकरे गट) ला आणखी एक धक्का बसण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली. यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे बोलले जाते.

मात्र, चंद्रहार पाटलांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ते वैयक्तिक कामासाठी रत्नागिरीला गेले असताना, जुन्या मैत्रीच्या नात्याने उदय सामंत यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं. त्या वेळी केवळ क्रीडा क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली असून कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे त्यांनी नमूद केले.

चंद्रहार पाटील म्हणाले, "माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. लवकरच या हितशत्रूंचा बंदोबस्त जनतेला दिसेल."

ते पुढे म्हणाले, "राजकीय डावपेचांपेक्षा माझ्यासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास अधिक महत्त्वाचा आहे, आणि यासाठी कोणत्याही व्यक्तीची भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही."

नेमकं काय घडलं?

  • चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, पण ही भेट फक्त स्नेहभोजनासाठी होती असे त्यांचे म्हणणे आहे.

  • भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असले तरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गट सोडण्याच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळले आहे.

  • क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भविष्यातही विविध नेत्यांशी संपर्क ठेवण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.