HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जन्म मृत्यू दाखल हवाय ? मग आता उशीर करू नका अन्यथा...

जन्म मृत्यू दाखल हवाय ? मग आता उशीर करू नका अन्यथा...

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : जन्म मृत्यूचा दाखल हवा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. जन्म मृत्यूचा दाखला हवा असेल तर आता वर्षभराच्या आतच अर्ज करावा लागणार आहे. जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठी उशिरा अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता हे दाखले  मिळण्यात अडचणी येणार आहेत. वर्षभरानंतर अर्ज केलेल्या नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला मिळणार नसल्याचे वृत्त आहे. 

या निर्णयामुळे नागरिकांनी वेळेतच जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठी अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. उशीर झाल्यास, भविष्यात विविध शासकीय योजना आणि कायदेशीर प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. या निर्णयाचा फटका प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्याची शक्यता अधिक आहे.

... तर अर्ज फेटाळला जाईल 

शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, जन्म किंवा मृत्यू झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आतच संबंधित दाखल्यासाठी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. एक वर्षानंतर अर्ज केल्यास तो फेटाळला जाईल.

याआधी, उशिरा अर्ज करणाऱ्यांना काही दंड भरून जन्म-मृत्यू दाखला मिळवता येत होता. परंतु, आता वर्षभरानंतर अर्ज करणाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध नसेल. या निर्णयामुळे नागरिकांना वेळेतच जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. उशीर झाल्यास त्यांना दाखला मिळणार नाही.

'यासाठी' जन्म मृत्यू दाखले आहेत आवश्यक 

दाखला न मिळाल्यास, नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येतील. तसेच, कायदेशीर प्रक्रियेत, जसे की मालमत्तेचा वारसा हक्क, बँक खाते उघडणे, पासपोर्ट बनवणे इत्यादी अडचणी येऊ शकतात.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.