शिवराज राक्षेचा आयोजकांवर मोठा आरोप, म्हणाला मी...

शिवराज राक्षेचा आयोजकांवर मोठा आरोप,  म्हणाला मी...

अहिल्यानगर: पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांपैकी यंदाचा महाराष्ट्र केसरी  कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीच्या दिवशी वादाची ठिणगी पडली. मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेली लढत अत्यंत चुरशीची ठरली. पण पंचाच्या निर्णयामुळे वाद चांगलाच पेटला. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवला. शिवराज राक्षेला पराभव मान्य नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयावर तीव्र विरोध करत थेट पंचांची कॉलर खेचली आणि त्यांच्यावर लाथही घातली. त्यामुळे वाद चांगलाच चिघळला होता. पंचांसोबत भिडल्यामुळे शिवराज राक्षेवर तीन वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे. 

माझी पाठ टेकली नव्हती, तसेच आपण पंचांना लाथही मारली नाही, असे सांगत त्याने आपली बाजू मांडली. “आमच्यावरील कारवाई चुकीची आहे. हे सर्वांनी पाहिल आहे. कुस्तू झाली त्यावेळी आम्ही पंचांकडे व्हिडीओ पाहून निर्णय घेण्याची  मागणी केली होती. त्याआधी ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनाही तसा अधिकार नाही. आम्ही तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडेही व्हिडीओ दाखवण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची मागणी केली.

जर दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. कुस्तीत हारजीत होत असते, त्याबद्दल शंका नाही. पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी, असं शिवराज राक्षेने म्हटलं आहे. 

रागाच्या भरात पंचांची कॉलर पकडून त्यांच्यावर लाथ घातली. शिवराज राक्षेने याआधी दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. त्याने आरोप केला की, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी त्याच्याविरोधात जाणूनबुजून निर्णय दिला गेला. यावर त्याचे वस्ताद काका पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आणि निर्णयाविरोधात आपली भावना व्यक्त केली.