जयपूर येथे भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू

जयपूर येथे भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूर येथे 20 डिसेंबर रोजी आगीची मोठी भीषण घटना घडली. सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, 14 लोकांचा मृत्यू झाला आणि आजुबाजूच्या तब्बल 40 पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले तर 30 लोकांची स्थिर गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला. 

मृतदेह इतके जळालेत की ओळखही पटेना 

जयपूर येथे लागलेल्या भीषण आगीत अनेक मृतांचे मृतदेह जल;आले आहेत. ते मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळखही पटत नाहीये. अशा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाच मृतांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. या आगीच्या घटनेत एक बस जळून खाक झालीये. या बसबद्दलची मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. या बसचे परमिट हे 16 महिन्यांपूर्वीच संपले होते.आगीच्या घटनेचा तपास केला जातोय. या प्रकरणी काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात. आगीच्या घटनेने लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण हे बघायला मिळतंय. आग इतकी जास्त भीषण होती की, आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत होत्या. आगीनंतर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. आगीत जळून खाक झालेली वाहने पोलिसांकडून क्रेनच्या मदतीने इतर ठिकाणी हलवण्यात आली.