जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने वृक्षारोपण...

कोल्हापूर प्रतिनिधी : क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संघटना आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर,क्रिडाई युथ विंग,क्रिडाई वुमेन्स विंग व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाई वाडी येथील पाण्याची टाकी परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज सकाळी १०.३० वा. घेण्यात आला. या ठिकाणी लिंब, आपटा,वड, पिंपळ कवठ, कदंब, करंज, निम, ताम्हाण,जारूळ,अशी देशी पद्धतीची १० फूट उंचीची रोपे क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष श्री.के.पी.खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर , कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता श्री. नेत्रदीप सरनोबत यांच्या शुभ हस्ते व उपशहर रचनाकार सतिश फपे, व आर के.पाटील, डॉ.विजय पाटील गार्डन अधिक्षक,राम चव्हाण सहायक उद्यान अधीक्षक, संजय सरनाईक सहायक उपायुक्त, अवधूत नेर्लेकर पर्यावरण अधिकारी यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. यावेळी के.पी. खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल,उपाध्यक्ष गौतम परमार,सचिव संदीप मिरजकर, खजानिस अजय डोईजड, सहसचिव गणेश सावंत, सहसचिव सोमराज देशमुख, सहखजानिस सचिन परांजपे, क्रिडाई महाराष्ट्रचे सचिव विद्यानंद बेडेकर, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव,क्रिडाई कोल्हापूर मॅनेजिंग कमिटी सदस्य विजय माणगांवकर, लक्ष्मीकांत चौगुले श्रीराम पाटील, आदित्य बेडेकर, विश्वजीत जाधव, सदस्य क्रिडाई महाराष्ट्र वूमेन्स विंग च्या को कन्व्हेनर सपना मिरजकर , क्रिडाई कोल्हापूर वूमेन्स विंगच्या कन्व्हेनर संगीता माणगावकर, को ऑडि॑नेटर मोनिका बकरे व जेष्ठ सभासद हेमंत सोनार, युथ विंग, आणि वुमेन्स विंगचे सदस्य उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने वृक्षारोपण...