विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती
मुंबई प्रतिनिधी– महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेल्या राधाकृष्णन यांची ही नियुक्ती राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी इतरही काही राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्रासाठी आणि इतर राज्यांसाठी महत्वपूर्ण आहे कारण नवीन राज्यपालांची घोषणा विविध राज्यांमध्ये प्रशासकीय बदल घडवून आणेल.