ठेकेदार जाणीवपूर्वक या झाडाच्या फांद्यांची छाटणी करत नाहीत
कोल्हापूर प्रतिनिधी : मंगळवार पेठेतील मिरजकर् तिकटीचौकात ७० ते ८० वर्षापासून एक डेरेदार वटवृक्ष मानवी जीवाला ऑक्सिजन देण्याचे काम करीत आहे. यापूर्वी प्रतिवर्षी उद्यान निरीक्षक या झाडाची पाहणी करून झाड सुरक्षित रित्या राहील या दृष्टीने झाडाचा बॅलन्स करून फांद्यांची छाटणी करीत होते. पण अलीकडच्या काळात काही लोकांनी तक्रार करून सुद्धा महापालिकेची मंजुरी असताना सुद्धा, ठेकेदार जाणीवपूर्वक या झाडाची फांद्या छाटून भार कमी करून छाटणी करीत नाहीत.
कारण यापूर्वी हे झाड पाडण्याचा बराच वेळा प्रयत्न झाला होता. आता झाडाच्या फांद्या अवास्तव वेड्यावाकड्या वाढल्यामुळे वाऱ्याच्या झोतामुळे झाड उन्हाळून पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण चौकाला शोभा आणून नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या या झाडाची येथे आवश्यकता आहे. महापालिकेने ताबडतोब झाडाची छाटणी करून झाडाला आधार द्यावा अशी मागणी अशोक पोवार, रमेश मोरे, राहुल चव्हाण, सदानंद सुर्वे यांच्यासह नागरिकांची आहे.