जिल्हा परिषदेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक तपासणी शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 'स्वच्छता ही सेवा- २०२४ (स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता) या मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने अधिनस्त सफाई कर्मचारी यांची नियमित शारीरिक तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमानाने, दि.०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून "स्वच्छता ही सेवा" (SHS) मोहीम दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार येत आहे. त्यासाठी 'स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता, ही थीम निश्चित करण्यात आली आहे. तसेच विविध विभागांना नेमून दिल्या प्रमाणे सदर मोहीम यशस्वी होण्याकरिता आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय संस्थांनी सदर सूचनांचा काटेकोर अवलंब करण्याची दक्षता घेणेबाबत सल्ला दिला आहे.
'स्वच्छता ही सेवा'- २०२४ (स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता) या मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषदेतील अधिनस्त सफाई कर्मचारी यांची नियमित शारीरिक तपासणी वजन, उंची, बी एम आय, रक्तदाब व इतर अनुषंगिक तपासण्या बरोबरच खालीलपैकी तपासण्या आपण विशेष तपासणी शिबिराचे आयोजन सर्व विभागाच्या समन्वयाने करून घेणेचे आहेत. सदर शिबीरामध्ये HILL Maha Lab व्दारे स्थानिक स्तरावर उपलब्ध असणा-या खालील तपासण्या वैदयकीय अधिकारी यांच्या सल्याने गरजेनुसार करुन घेणेत यावेत. सदर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता ही पहावी. याच सोबत आरोग्य विषयक अनुषंगिक सल्ला व आवश्यकतेनुसार संदर्भसेवा देण्यात याव्यात.