आंतरराष्ट्रीय अन्वेषन संशोधन स्पर्धेत विद्यापीठाचे विद्यार्थी तृतीय

कोल्हापूर प्रतिनिधी : पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व तंत्रान टात तृतीय क्रमांक पटकावला.
शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा चित्कारा विद्यापीठ, पंजाब येथे दि. १० ते ११ मार्च, २०२५ या कालावधीत झाली. स्पर्धेमधील ३ संशोधन शाखांसाठी शिवाजी विद्यापीठामार्फत ०८ जणाचा संघ सहभागी झाला.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या शाखेतून शुभम गिरीगोसावी, बालाजी प्रकाश पाटील व रोहित गणपती गवळी या विद्यार्थ्यांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सदर विद्यार्थ्यासोबत समन्वयक म्हणून डॉ पी. के. पवार (जीवरसायनशास्त्र अधिविभाग) तर संघव्यवस्थापक म्हणून सुशांत सुरेश पंगम (शिवराज कॉलेज, गडहिंग्लज) व डॉ श्रीमती शुभांगी रामचंद्र कांबळे (देशभक्त आनंदराव बी. नाईक कॉलेज, चिखली) होते.
सदर अन्वेषन संशोधन स्पर्धेसाठी विद्यापीठ संघास प्रा. डॉ. डी. टी. शिर्के मा. कुलगुरु, प्रा. डॉ. पी. एस. पाटील मा. प्र-कुलगुरु, डॉ. व्ही. एन. शिंदे, मा. कुलसचिव, डॉ. टी. एम. चौगले, संचालक, विद्यार्थी विकास, डॉ. डी. एच. दगडे, आविष्कार समन्वयक] डॉ. पी. के. पवार, जीवरसायनशास्त्र अधिविभाग, डॉ. टी. डी. डोंगळे, नॅनो सायन्स अधिविभाग, डॉ एस डी जाधव, विलिंग्डन कॉलेज, सांगली व विद्यार्थी विकास विभागातील सर्व प्रशासकीय सेवक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.