HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

६ ऑक्टोबरला रंगणार रास रसिया दांडिया

६ ऑक्टोबरला रंगणार रास रसिया दांडिया

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्यावतीने ६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रास रसिया दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बाराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध गटातील विजेत्यांना एक लाखापेक्षा अधिक रकमेची बक्षीस देऊन गौरवण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक आणि इनरव्हीलच्या अध्यक्षा गीता कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 रोटरीच्या वतीने जगभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यासाठी रोटरीचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील उद्योजक, मान्यवरांकडून रोटरीला मदतीचा हात दिला जातो. तसेच रोटरीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यातून मिळालेेले उत्पन्न सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केले जाते. यंदा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्सच्या वतीने ६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रास रसिया दांडिया स्पर्धा रंगणार आहे.

स्पर्धेसाठी बाल, युवा, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे ४ गट तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी बाल गट सोडून इतरांना पाचशे रुपये फी असणार आहे. बेस्ट बॉय, बेस्ट गर्ल, बेस्ट चाइल्ड यासह विविध गटात एक लाखांपेक्षा अधिक बक्षीसांचे वाटप विजेत्यांना केले जाईल, असे सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. तसेच स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना श्री अंबाबाई देवीची मानाची साडी दिली जाणार आहे. तसेच बंपर लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी महाद्वार रोडवरील भांबूरे कलेक्शन, भेंडे गल्लीतील गणेश ट्रॅव्हल्स एजन्सी, ताराबाई पार्कातील अक्कीज बीस्ट्रो, राजारामपुरीतील कशिश कलेक्शन, नागाळा पार्कातील सिरॅफिक ब्युटी पार्लर येथे नाव नोंदणी करावी. १० तिकिटे खरेदी केलेल्यांना १ तिकीट फ्री दिले जाणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत रास रसिया सुरू राहणार असल्याचे सौ. अरूंधती महाडिक आणि इनरव्हीलच्या अध्यक्षा गीता कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव, रोटरीचे ज्येष्ठ सदस्य बी. एस. शिंपूकडे, नेत्रा कुरबेट्टी, अकेत शहा, जिग्ना वसा, सुवर्णा गांधी, अश्विनी टेंबे उपस्थित होत्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.