ज्या ठिकाणी अनेकदा 'बॉलिवूड' विसावलं; मिनी स्विट्झरलँड पहलगाम आणि सिनेसृष्टीचं कनेक्शन....

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack:जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय.
पण, ज्या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या पहलगामवर दहशतवाद्यांनी निशाणा साधला, ते पहलगाम मिनी स्विट्झरलँड म्हणून ओळखलं जातं. इथे अनेक सिनेमांचं चित्रिकरणही करण्यात आलंय.
बेताब (Betab): सनी देओल आणि अमृता सिंह स्टारर सिनेमातही पहलगामचं सौंदर्य दाखवण्यात आलंय.
बॉबी (Boby): ऋषी कपूर आणि डिंम्पल कपाडिया स्टारर बॉबी सिनेमातही पहलगाम दिसलंय.
हायवे (Highway): आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा स्टारर हायवे चित्रपटाचा क्लायमॅक्स पहलगाममध्ये शूट करण्यात आला आहे.
ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani Hai Deewani): रणबीर कपूर, दीपिका पादुकोण स्टारर 'ये जवानी है दीवानी' सिनेमातील काही सीन्समध्ये कश्मीरला मनाली म्हणून दाखवण्यात आलं आहे.
जब तक है जान (Jab Tak Hai Jaan): शाहरुख खान, कतरिना कैफ स्टारर 'जब तक है जान' सिनेमाचं शुटींगसुद्धा पहलगाममध्ये झालं आहे.
लैला-मजनू (Laila Majnu) : काही दिवसांपूर्वी आलेल्या 'लैला-मजनू' सिनेमातील काही सीन्स पहलगाममध्येच चित्रित करण्यात आले होते. सिनेमातील सीन्समधून पहलगामचं सौंदर्य पाहायला मिळतंय.
राझी (Raazi): 'राझी' फिल्ममध्ये जेव्हा आलिया लग्नानंतर पाकिस्तानला जाते, तेव्हाचा सीन पहलगामच्या काही डोंगराळ भागात चित्रित करण्यात आलाय.
रॉकस्टार (Rockstar): रणबीर कपूर आणि नरगिस स्टारर 'रॉकस्टार'च्या काही सीन्सची शुटिंग कश्मीर आणि पहलगाममध्ये करण्यात आलेली.
बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan): सलमान खानची सुपरहिट मुव्ही बजरंगी भाईजानचं चित्रीकरणही याच ठिकाणी झालयं.