HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

तात्यासाहेबांच्या स्वप्नातील नव्या माणसाचं स्वप्न पूर्ण होतंय : आ. डॉ. विनयरावजी कोरे

तात्यासाहेबांच्या स्वप्नातील नव्या माणसाचं स्वप्न पूर्ण होतंय : आ. डॉ. विनयरावजी कोरे

वारणानगर (प्रतिनिधी) - १९८० च्या दशकात जेव्हा अभियंता होणे अशक्यप्राय गोष्ट होती तेव्हा तात्यासाहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खाजगी तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले याचा उद्देश म्हणजे एक नवा माणूस निर्माण करणे होते. आत्तापर्यंत वारणे मधून जगाच्या कानाकोपरा अभियंते कार्यरत आहेत, म्हणजेच तात्यासाहेबांनी पाहिलेले नवा माणूस निर्माण करण्याचे स्वप्न वारणा परिसरात मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण झाल्याचे मत श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालय आयोजित सन २०२४-२५ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवानिमित्त आयोजित केलेल्या प्लेसमेंट डे वेळी ते बोलत होते.

आ. डॉ. विनयरावजी कोरे पुढे म्हणाले की, नुकत्याच भारतीय संरक्षण दलाने पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूर यामधून भारताची संरक्षण यंत्रणा भक्कम असल्याचे दिसून आले, यामध्ये त्यांनी अभियंत्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. नव्याने स्थापन झालेले वारणा राज्य सार्वजनिक विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व वारणेचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील असे सांगितले.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविक आणि स्वागतामध्ये यावर्षी आत्तापर्यंत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाल्याचे सांगितले तसेच अनेक कंपन्यांचे निकाल प्रलंबित असल्याचे सांगितले. सरासरी पाच लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले. आजच एलजी कंपनीमध्ये तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालया बरोबर शिक्षण मंडळातील तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक आणि आयटीआय यांचेही 100% प्लेसमेंट झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांनी वैष्णवी आडनाईक: इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, अनिकेत शिंदे: सिव्हील, ईशा पाटील: केमिकल, साहिल चौगले: मेकॅनिकल, प्रणाली घनवट: कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, यांनी तात्यासाहेब कोरे यांनी सुरू केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व सध्याच्या व्यवस्थापन, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, डॉ. एस. एम. पिसे, अधिष्ठाता, प्रभारी प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, पॉलिटेक्निकचे विभाग प्रमुख, प्रा. पी.आर..पाटील, प्रा. आर. सी. शिक्केरी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.