HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद - माजी आ. ऋतुराज पाटील

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद - माजी आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आ. ऋतुराज पाटील यांनी काढले. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून पॉलिटेक्निकला मिळालेल्या ‘व्हेरी गुड’ श्रेणीबद्दल गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ९७.१४ टक्के गुण मिळविणाऱ्या आदित्य हराळे याला यावर्षीचा ‘अकॅडमीक चॅम्पियन’ म्हणून गौरविण्यात आले. 

पाटील पुढे म्हणाले,  पॉलिटेक्निकला यावर्षीही ‘व्हेरी गुड’ श्रेणी मिळाली याचा अभिमान वाटतो. शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करणे हि अवघड गोष्टही आमच्या १८  विद्यार्थ्यांनी साध्य करून दाखवली आहे. हे विद्यार्थी आणखी उंच झेप घेऊन स्वतःबरोबरच आई-वडिल आणि संस्थेचे नाव मोठे करतील याचा विश्वास आहे. 

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिटेक्निक सातत्याने प्रगती करत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे. विद्यार्थी हेच आमचे ब्रँड अँबेसिडर अशी भूमिका घेऊन सर्व स्टाफ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत आहेत, असे नमूद केले.

या कार्यक्रमात मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या सर्व शाखांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचा तसेच विषय शिक्षक प्रा.अर्चना जोशी प्रा.रणजीत कदम, प्रा.सुवर्णा टोणे,प्रा.पूजा मोरे यांचाही गौरव करण्यात आला. 

यावेळी आदित्य हराळे, स्वराली पाटील, अथर्व खोत या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. राज अलास्कर यांनी सूत्रसंचालन केले. 

या कार्यक्रमाला कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख प्रा.डॉ. पी. के. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शितल साळोखे, प्रा. अजय बंगडे, प्रा. एस. बी. शिंदे  यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.