डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन!
महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले.
७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.
आचार-विचारांत भरली राष्ट्रनिष्ठा, लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
__________________________________________________________________________-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बाबासाहेबांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर अभिवादन करताना
चैत्यभूमीवर अभिवादन करत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यपाल सीपी राधाकृष्णन व अन्य राजकीय नेते, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.