HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डोंगळे यांची भूमिका योग्यचं ; ना. मुश्रीफांनी महायुती चा धर्म पाळावा - नाथाजी पाटील

डोंगळे यांची भूमिका योग्यचं ; ना. मुश्रीफांनी महायुती चा धर्म पाळावा -  नाथाजी पाटील

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलाआहे परंतु गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतलेली आहे.खरंतर अरुण कुमार डोंगळे हे गेली दोन - अडीच वर्ष महायुतीचे नेते म्हणून काम करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जोमाने प्रचार केला. विधानसभेच्या निवडणुकीत राधानगरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रकाश अबिटकर, कागल मतदार संघात हसन मुश्रीफ तर करवीर मतदारसंघात चंद्रदीप नरके यांचा प्रचार केला. या तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षांची महायुती अस्तित्वात राहिली पाहिजे अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेऊन गोकुळ दूध संघात महायुतीचाच चेअरमन राहिला पाहिजे. ही भूमिका योग्य असल्याचे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे नेते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नेतृत्व करतात. सहकारी संस्थांच्या कामकाजात सुद्धा मंंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका ही महायुतीला पूरकच असली पाहिजे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीशी प्रतारणा न करता अरुण कुमार डोंगळे यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा व गोकुळ दूध संघात महायुतीचा चेअरमन राहील आणि त्याचे नेतृत्व मंत्री मुश्रीफच करतील यासाठी प्रयत्न करावेत असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केले. 

अडीच वर्षांपूर्वी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन सत्ता स्थापन केली त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रवादी पक्षात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला. यावेळी अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ यांनीही वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाची शपथ घेऊन त्यांना महायुतीने कोल्हापूरचे पालकमंत्री केले. गेल्या अनेक वर्षांच्या काळात मंत्री होऊनही हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळवता आले नव्हते.

पण महायुती सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी मंत्री मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली आहे अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या बाबतीत सुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी सोयीची भूमीका न घेता महायुतीशी सुसंगत भूमिका घेऊनच जिल्ह्याचे राजकारण करावे. महायुतीचे खायचे आणि महाविकास आघाडीचे गायचे अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी सोडून द्यावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांच्या मध्ये महायुती कशी सत्तेतील हेच पाहणे गरजेचे आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय इतिहास पाहता ते प्रत्येक वेळी आपली सोयीची भूमिका घेतात पण महायुती सत्तेत असताना सध्याच्या घडीला त्यांनी महायुतीशीच प्रामाणिक राहून काम करायला हवे. 

सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सोबत पूरक भूमिका घेऊन मंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीच्या विचाराशी प्रतारणाच करत आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना बळ देण्याची भूमिका घेत आहेत अशी मंत्री मुश्रीफ यांची भूमिका चुकीची असून, आपण ज्या महायुतीच्या जीवावर मंत्री झालो त्या महायुतीच्या ताब्यात जिल्ह्याचे राजकारण राहिले पाहिजे अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी घ्यायला हवी. नाहीतरअशा सहकारी संस्थांच्या कारभारात महाविकास आघाडीं च्यानेत्यांना बळ देऊन त्यांच्याशी पूरक भूमिका घेणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांच्याबद्दल आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे दाद मागावी लागेल असेही पाटील म्हणाले .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.