HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अख्ख घाटगे कुटुंबच राजे समरजितसिंहांच्या प्रचारात : गावागावातील महिला, शेतकरी, तरुणाईचा यंदा परिवर्तनाचा निर्धार

अख्ख घाटगे कुटुंबच राजे समरजितसिंहांच्या प्रचारात : गावागावातील महिला, शेतकरी, तरुणाईचा यंदा परिवर्तनाचा निर्धार

 कागल (प्रतिनिधी) : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी,कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. शाहुंच्या या भूमीत सध्या विधानसभेच्या निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू आहे. शाहूंच्या रक्ताचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द त्यांच्या कुटुंबीयांचा प्रचारातील झंझावात हा तालुक्यातील मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी बनलेला आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, राजे विरेंद्रसिंह घाटगे, राजे अखिलेशसिंह घाटगे,सौ.श्रेयादेवी घाटगे,यश घाटगे हे आघाडीवर असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. त्यामुळे राजे समरजितसिंहांच्या विजयासाठी अख्खं घाटगे कुटुंबच दमदार प्रचारात रमलं असल्याच्या भावना मतदार संघातील जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.

     विशेष म्हणजे घाटगे कुटुंबियांच्या या प्रचारात महिला, शेतकरी, युवक, युवती, अबालवृद्ध हे प्रचाराच्या केंद्रस्थानी असून त्यांचा मिळत असलेला प्रतिसाद हा उत्स्फूर्त आहे. शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्याच्या माध्यमातून जनतेचा उंचावलेला आर्थिक स्थर तसेच गेल्या नऊ वर्षांपासून समरजितसिंह घाटगे यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून तालुक्यात केलेली शाश्वत विकासकामे आणि मतदारसंघाबाबतचे त्यांचे व्हिजन दारोदारी जाऊन मतदारांना पटवून सांगत आहेत.

      तसेच राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने गेली नव वर्षे महिलांना स्वावलंबी बनवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीर घेणे, महिला व युवतींना प्रशिक्षण देणे तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम सौ.नवोदिता घाटगे यांनी केले आहे. गेली नऊ वर्षे त्यांनी केलेले कार्य आणि ठेवलेला संपर्क पाहता सर्वसामान्यांच्या मध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहेत. त्या राजघरातील असून सुद्धा सर्वसामान्यांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारख्या वाटततात. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

       सध्या सर्वत्रच सुगीचे दिवस असल्याने माणसं आपापल्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. याची जाणीव आणि भान ठेवून घाटगे कुटुंबीय विधानसभा मतदारसंघ हा आपले कुटुंब मानत असल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्यक्षात वाड्या-वस्त्यांवर, शेतात तसेच गल्लीबोळात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. घाटगे कुटुंबीयांच्या या गाठीभेटींमध्ये समाजातील सर्वच स्तरातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून " यंदा परिवर्तन करायचंय" अशा भावना मतदारातून मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळत आहेत.

 *समरजितराजे कुटुंबातील सदस्य.....* 

       यावेळी पिंपळगाव खुर्द गावातील पंचायत समितीच्या माजी सदस्य उल्का तेलवेकर म्हणाल्या समरजितराजे आमच्या कुटुंबियातील एक सदस्य आहेत. उच्चशिक्षित आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांना लागलेला नाही.तसेच समाज उभारणीचे त्यांचे स्वप्नही आदर्शवत आहे. माता भगिनी, आबालवृद्धांचा मान-सन्मान हा तर त्यांच्यावर झालेला संस्कारच आहे. त्यामुळे अत्यंत पारदर्शक नेतृत्व आणि कर्तृत्व असलेल्या आमच्या राजेंना या विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील तमाम जनता नक्की पाठवेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.