डोंगळेंचा राजीनामा, नव्या अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा

डोंगळेंचा राजीनामा, नव्या अध्यक्षपदाच्या निवडीचा  मार्ग मोकळा

कोल्हापूर :  गेल्या आठ - दहा दिवसांपासून  घडत असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी त्यांचा राजीनामा दिला. 

गोकूळच्या अध्यक्षपदावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यान जिल्ह्याच्या मात्तबर नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. पण आता अध्यक्ष पदाचा हा तिढा सुटला आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी बाबासाहेब चौगले यांचे नाव चर्चेत  होते. आता त्यानंतर गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर  यांचे  सुपुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांचं नावही  पुढं  आलं. शशिकांत पाटील हे आमदार सतेज पाटील गटाचे संचालक आहेत. त्यातच ते  संस्थापकांचे चिरंजीव असल्याने त्यांना अध्यक्षपदाची संधी  मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  यातच अजित नरके यांचेही नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले. आता वरिष्ठ नेत्यांचा निर्णय काय होणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.