डीकेटीईच्या टेक्स्टाईलमधील सात विद्यार्थ्यांची जॉर्डन येथील क्लासीक फॅशन ऍपेरिएल कंपनीत प्लेसमेंट

डीकेटीईच्या टेक्स्टाईलमधील सात विद्यार्थ्यांची जॉर्डन येथील क्लासीक फॅशन ऍपेरिएल कंपनीत प्लेसमेंट

इचलकरंजी (प्रतिनिधी) - डीकेटीई मधील टेक्स्टाईल विभागातील सात विद्यार्थ्यांची जॉर्डन येथील क्लासीक फॅशन ऍपेरिएल, या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उत्तम पॅकेजवर प्लेसमेंट झाली आहे. यामुळे परदेशात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करुण देण्याची डीकेटीईची परंपरा कायम राहीली आहे. निवड झालेले सातही विद्यार्थी जॉर्डन येथील क्लासीक फॅशनमध्ये विविध पदावर रुजु झाले आहेत.    

क्लासीक फॅशन ही मिडल इस्ट नॉर्थ अफ्रिका मधील सर्वात मोठी आणि आघाडीची वस्त्रनिर्मिती कंपनी असून ही कंपनी जगभरातील अनेक प्रसिध्द बँ्रण्डसाठी परिधान उत्पादन करते.क्लासीक फॅशन ही हाय व्हाल्युम, फास्ट फॅशन ऍपरिएल मॅन्युफॅक्चरींगसाठी ओळखली जाते.इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञान रोबोटीक ऍटोमेशन, प्रगत एआय टेक्नॉलॉजी वापरुन वस्त्रोद्योगातील उत्पादने निर्मिती करते.  

डीकेटीईचे आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी व कंपन्या यांच्याशी असलेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी शिकत असतानाच परदेशातील कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेत असतात.यापूर्वी डीकेटीईचे विद्यार्थी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, थायलंड, व्हिएतनाम, बेहरीन, हॉंगकॉंग, सिंगापूर इत्यादी इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवरती उच्च पदावर कार्यरत असून त्यांनी डीकेटीईच्या गुणवत्तेला जागतिक पातळीवर सिध्द केले आहे.  

डीकेटीई मध्ये व्दितीय वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते त्याचबरोबर ‘सॉफ्ट स्किल’ उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत कम्युनिकेशन स्किल्स, लॉजीकल थिंकींग, मॅनेजमेंट टेक्निक्स अशा विविध विषयांचे सखोल ज्ञान तज्ञ मार्गदर्शकांव्दारे दिले जाते.विद्यार्थ्यांची प्रि-प्लेसमेंट टेस्ट व्दारे इंटरव्हयूची तयारी करुन घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या कंपनी ट्रेनिंगमूळे विद्यार्थी आत्मविश्‍वासाने, सक्षमपणे इंटरव्हयूला सामोरे जावून यशस्वी होतात.  

प्लेसमेंट झालेले विद्यार्थी - एस युगान, वैष्णवी नौगन, भाग्यश्री खाडे, प्रमोद देशमुख, सानिया पठाण, योगिता घरसे व दुर्गा कराडखेडकर.  

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे,उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या प्लेसमेंटसाठी संस्थेचे टेक्स्टाईलचे टीपीओ प्रा.एस.बी. अकिवाटे यांनी विशेष परीश्रम घेतले.