भारतीय विद्यार्थी मोर्चाकडून कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर - शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी रुची निर्माण व्हावी आणि उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने विविध स्तरांवर खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकाऱ्यांनी एका पात्र विद्यार्थीनीच्या प्रस्तावाला नामंजुरी दिली.
या निर्णयामागील कारण विचारले असता संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ केली असल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी मोर्चाने केला आहे. कार्यालयातील ही गोंधळाची आणि निष्काळजी कार्यपद्धती लक्षात घेता, संबंधित विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत असून, या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश कांबळे व सोशल मीडिया प्रभारी किशोर माणकापुरे यांनी दिला आहे.