तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाची आंतरराष्ट्रीय परिषद दोहा, कतारसाठी निवड

वारणानगर : तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक प्रा. गौतम कांबळे, विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुळीक व अंतिम वर्षातील विद्यार्थी मानसी मुळीक, ऋचा भिसे, निवेदिता यम्मी, नेत्रा पानवळ यांच्या "स्टडी ऑफ थर्मल परफॉर्मन्स ऑफ नॉक्टर्नल कूलिंग असिस्टेड हायब्रीड एअर कंडिशनिंग सिस्टिम यूज्ड इन इन्सुलेटेड ब्रिक कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग फॉर हॉट क्लायमॅट" या शोधनिबंधाची निवड 'एनर्जी आणि इनडोअर इन्व्हरमेंट फॉर हॉट क्लायमॅट' या दोहा, कतार येथील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी झाली आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कॉन्डशनिंग इंजिनिर्स (ASHRAE) आणि गल्फ ऑर्गनाईझेशन फॉर रिसर्च डेव्हलपमेंट (GORD), कतार यांनी दिनांक २३ -२४ एप्रिल २०२५ रोजी केले आहे.
या शोधनिबंधात नाविन्यपूर्ण अश्या नॉक्टर्नल कूलिंग पद्धतीचा वापर हा पारंपरिक एअर कंडिशनिंग सिस्टिम मध्ये केला गेला आहे. या विकसित केलेल्या प्रणालीचे उष्ण वातावरणातील उष्णतारोधक विटांच्या बिल्डिंगमधील कार्यक्षमतेविषयीच्या विविध घटकांचा अभ्यास या शोधनिबंधात मांडला आहे. या अभ्यासामुळे पारंपरिक एअर कंडिशनिंग सिस्टिम मध्ये ऊर्जेची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.
श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डीन, डॉ. एस. एम. पिसे, सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.