धक्कादायक प्रकार..! मोठ्या जनावरांचे अवशेष थेट पंचगंगेत

धक्कादायक प्रकार..!  मोठ्या जनावरांचे अवशेष थेट पंचगंगेत

कोल्हापूर प्रतिनिधि: पंचगंगा नदीत नागरी वस्तीतील सांडपाणी औद्योगिक वसातीतील रासायन युक्त पाण्यासोबत म्हैस बैल रेडकू अशा कत्तल केलेल्या जनावरांचे पाय हाडे मुंडके मासलभागनैसर्गिक नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळला जातोय याबाबत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने मार्केट यार्ड तावडे हॉटेल परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.

या नाल्यातून लगतच्या ग्रामीण उंचगाव गावचा भाग शहरातील टेंबलाई वाडी, विक्रम नगर मार्केट यार्ड या परिसरातील सांडपाणी कधी कधी ड्रेनेचेही पाणी आणि या परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहतींचे रासायनिक पाणीवीट भट्टी नावाने ओळखल्या जाणाऱ्या  नाल्यातून थेट पंचगंगा नदीत कोणत्याही प्रक्रिये शिवाय महापालिकेने सोडले आहे. 

स्थानिक शेतकरी बन्सी मते सुनील कोंडेकर यांनी सांगितले की या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अमृत दोन या योजनेतून रुपये सात कोटी निधी महानगरपालिकेकडे वर्ग झाला आहे. आणि हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी लागणारी जमीन येथील शेतकऱ्यांनी लेखी पत्र देऊन महापालिका आयुक्तांना देऊ केली असताना निव्वळ महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या आळशी आणि बेजबाबदार पणामुळे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीचे काम रखडले आहे याबाबत महापालिका आयुक्तांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी अशी जोरदार मागणीया ठिकाणी पाहणी करून पंचनामा करण्यासाठी आलेले कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षत्रिय अधिकारी ए आर पाटील यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी पाटील यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून महापालिकेवर गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन देऊन तातडीने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीचे आदेश दिले जातील असे सांगितले

  या थेट पंचगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे नजीकच्या शिरोली निगडेवाडी गांधीनगर वळीवडे चिंचवड पुढे रुई बंधाऱ्यापर्यंत गावातील लोकांना या दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याचे या भागातील आलेल्या शेतकरी व नागरिकांनी सांगितले

    यावेळी अशोक पोवार, बन्सी मते, सुनील कोंडेकर राजाभाऊ मालेकर, राहुल पाटील, शहाजी नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव पाटील, सचिन बडे, सुरज थोरी,   कांचन भोसले , निपेन पॉल, विकास बर्मन, अजिंक्य मतेपती, पवन पॉल, लैला शेख, आदींसह या परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते