दहावीतील विद्यार्थ्याने स्वतःवरच झाडली गोळी
पाटणा : वडिलांच्या रिव्हाल्व्हर मधून गोळी मारून घेऊन दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने केली आत्महत्या. हि दुर्दैवी घटना बिहारमध्ये घडली. परवाना असलेल्या वडिलांच्या रिव्हाल्व्हरमधून मुलाने स्वतःवरच गोळी झाडली. बिहार येथील भागलपूर गावात हि घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनेसाठी पाठविला. रिव्हॉल्वर तपासासाठी ताब्यात घेतली आहे . मुलाचा मोबाईलहि जप्त करण्यात आला.
याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले कि सहामाही परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले होते यामुळे तो नाराज होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने मी जीव देतोय असा मेसेज मित्रांना पाठविला होता. अधिक तपास करण्यासाठी पोलीस कुटूंबीयांकडून व मुलाच्या मित्रांकडून माहिती घेत आहेत.