HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

दोन वर्षात आबिटकरांनी कुठल्याही कर्जाशिवाय स्वतःची १२७ कोटींची खासगी शिक्षण संस्था कशी उभारली? - के पी पाटील

दोन वर्षात आबिटकरांनी कुठल्याही कर्जाशिवाय स्वतःची १२७ कोटींची खासगी शिक्षण संस्था कशी उभारली? - के पी पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : "कुठल्याही कर्जाशिवाय आबिटकरांनी गुहावटीवरून आल्यानंतर केवळ २ वर्षांत स्वतःची खासगी १२७ कोटी रुपयांची नॉलेज सिटी कशी उभारली ? ही तर गद्दारीचे गुहावटीचे ५० खोके आणि वारेमाप कमिशनची करामत असल्याचा हल्लाबोल माजी आमदार के पी पाटील यांनी केला.

म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेत आमदार आबिटकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताना ते पुढे म्हणाले,"तुमचे सर्व कारनामे जनतेला माहित झाले आहेत, तरीही मी तुम्हाला विचारतो, तुमच्या खासगी नॉलेज सिटीसाठी

भुदरगड तालुक्यातील पाल येथे २ वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा दर काय होता? तेथे कोणतेही कर्ज न घेता तब्बल ९७ एकर जमीन तुम्ही कुठल्या पैशाच्या माध्यमातून खरेदी केली? केवळ दोन वर्षांत शासनाकडून कसल्याही प्रकारचे अर्थसाहाय्य न घेता एवढ्या मोठ्या रकमेची खासगी नॉलेज सिटी उभारणे तुम्हाला विना भ्रष्टाचार शक्य होते काय? केवळ एक कॉलेज काढायचे म्हटले तरी कोट्यावधी रुपये खर्च येतो, त्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते,मग तुम्ही दहा कॉलेज कर्ज न घेता कुठल्या पैशाच्या जोरावर काढली? त्या जमिनींच्या खरेदीसाठी कुणाकुणाला नोकरीचे आमिष दाखविले व त्यांना नोकऱ्या दिल्या काय? तुम्ही ही नॉलेज सिटी गद्दारीच्या बदल्यात केवळ आणि केवळ सुरत व गुहावटी मधून मिळालेले खोके आणि विकास कामांच्या भ्रष्टाचारी कमिशन मधून म्हणजेच जनतेचे नुकसान करून पाडलेल्या ढपल्यातून उभी केली हे जनता जाणून असल्याने याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून मिळेल."

प्रा.किसन चौगले म्हणाले," आबिटकरांचे प्रेम जनतेवर नसून केवळ पैशावर आहे हे आता लपून राहिलेले नाही. पैसा कमावणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट असल्याने या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे."

राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

यावेळी धैर्यशील पाटील- कौलवकर, संजयसिंह पाटील, ए डी चौगले यांची भाषणे झाली. प्रचार सभेपूर्वी दिवसभरात भित्तमवाडी,गवशी, कोतोली,गावठाण, कोते, गोतेवाडी, खामकरवाडी, पखालेवाडी, मानेवाडी, पाल बुद्रुक, पालखुर्द, चांदे,लाडवाडी, केळोशी, सुतारवाडी आदी गावांचा

संपर्क दौरा झाला. यावेळी पी डी धुंदरे,सदाशिवराव चरापले,सचिन घोरपडे,सर्जेराव पाटील, प्रसाद पिल्लारे, विलास निकम, अस्लम मुल्लाणी, कृष्णात बरकाळे,दादू पाटील,संजय ठाकरे, संजय कांबळे,अशोक पाटील आदी उपस्थित होते.

*गद्दार,भ्रष्टाचारी भस्मासुरापासून मतदारसंघ वाचवुया* 

अनेक विकासकामांना मंजुरी नाही,जे काम केले त्याला दर्जा नाही,निकृष्ट विकास कामातून केवळ आणि केवळ कमिशन उकळणे आणि जेथे मिळेल तेथे जमीन घेणे एवढा एकच सपाटा लावणाऱ्या या गद्दार आणि भ्रष्टाचारी भस्मासुराला या निवडणुकीत पराभूत करून राधानगरी मतदार संघ त्यांच्यापासून वाचवुया असे के पी पाटील म्हणताच जनसामुदायातून शिट्ट्या आणि टाळ्यांचा एकच आवाज घुमला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.