HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रस्त्यासाठी न मागता पी.एन.पाटील यांनी ५० लाखांचा निधी दिला - सातार्डे सरपंच दादासाहेब पाटील

रस्त्यासाठी न मागता पी.एन.पाटील यांनी ५० लाखांचा निधी दिला - सातार्डे सरपंच दादासाहेब पाटील

करवीर (प्रतिनिधी) : स्व.आम. पी.एन. पाटील यांनी मतदारसंघातील गावागावांत विकासकामे केली. सातार्डे गावांत लागेल तेवढा निधी दिला. गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहून स्वत: पी.एन. पाटील यांनी बोलावून घेऊन आम्ही रस्तेकामासाठी ५० लाखांचा निधी दिला. ज्या पद्धतीने पी. एन. पाटील यांनी विकासकामाना गती दिली तिला ताकदीने पुढे नेण्याचे काम राहुल पाटील करतील यात शंका नाही. सातार्डे आणि परिसरातून भरघोस मतांनी राहून पाटील यांना निवडून आणणार असल्याचा विश्वास सरपंच दादासाहेब पाटील यांनी दिला. 

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पी. पाटील यांच्या सातार्डे (ता.पन्हाळा) येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय मोरे होते. यावेळी राहुल पाटील यांनी यवलूज, पडळ, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे आदी गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यावेळी राहुल पी. पाटील म्हणाले, एक दीड महिन्यात मतदारसंघातील गावागावांत हा तिसरा प्रचार दौरा आहे. महाविकास आघाडीची ताकद आपल्यासोबत आहे. लोकसभेप्रमाणे ताकदीने कामाला लागावे. हात चिन्हासमोरचे बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावी.

उबाठाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार म्हणाले, विरोधकांबरोबर आम्ही काम केले आहे. खोटं बोल पण रेटून बोल एवढाच त्यांचा उद्योग आहे. शिवसैनिक फुटल्याचा कांगावा ते करत आहेत. मात्र पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिक राहुल पाटील यांना आमदार करून गद्दारांना धडा शिकविणार आहे.

दिलीप मिसाळ, विक्रम पवार, संजय मोरे यांची भाषणे झाली. गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, श्रीकांत मोरे, शशिकांत आडनाईक, रणधीर पाटील, निवास पाटील, विलास रामाणे, सुभाष रामाणे, विक्रम पवार, एकनाथ पाटील, मानसिंग पाटील, सागर लाड, विजय पाटील, प्रसाद पाटील, संजय चव्हाण, राजू पाटील, पंडित पवार, नामदेव रामाणे, ग्रामस्थ उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.