नियोजित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची मार्गीका बदला - आमदार प्रकाश आबिटकर

नियोजित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची मार्गीका बदला - आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी)राज्य शासनाने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्याचे नियोजित केले असून या महामार्गामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हजारो एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. या अनुषंगाने माजी खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या मार्गाला तत्काळ स्थगिती देऊन महामार्गाची मार्गीका बदलण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 

त्यानुसार नुसार एमएसआरडीसी कडून प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मुख्यमंत्री महोदयानी दिलेल्या आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम व असंतोष हा महामार्ग रद्द करून दूर होणार आहे.