नागपूरमध्ये अमली पदार्थासह ६५ लाखाचा माल जप्त

नागपूरमध्ये अमली पदार्थासह ६५ लाखाचा माल जप्त

नागपूर : नागपूरमध्ये अमली पदार्थासह ६५ लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला. ३१ डिसेंबरनिमित्त हा माल नागपुरात येत होता. यामध्ये 54 लाख 4 हजार रुपये किमतीची 554 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर, 81 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि 10 लाख रुपये किमतीची डस्टर कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पाच जणांना पोलिसांनी अटक केली. अंमली पदार्थ राजस्थानहून मध्य प्रदेश मार्गे आणले जात होते. खबऱ्या मार्फत हि माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी आरोपीला कोराडी तलावाजवळ अटक केली आहे.

मिळालेला माहितीनूसार, नवीन वर्षामुळे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज शहरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी कोराडी तलावाजवळ पाच आरोपींचा फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून डस्टर कारमधून ड्रग्जसह अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन उर्फ मिहीर मिश्रा, पलाश दिवेकर, सुमित चिंतलवार, शेख अतिक फरीद शेख उर्फ भुरू आणि मनीष कुशवाह यांचा समावेश आहे. यापूर्वीही अटक करण्यात आलेल्या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न आणि मकोका अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.