ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन

मुंबई - हिंदी चित्रपटसुष्टीतील 'भारत कुमार' नावाने ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले. मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मनोज कुमार यांनी पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणून कार्य केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'रोटी, कपडा और मकान' हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत.
मनोज कुमार यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली होती. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी अभिनयाबरोबर इतरही क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती.