HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

परिवर्तन महाशक्तीच्या अरुण सोनवणेंचा आ.ऋतुराज पाटील यांना पाठिंबा

परिवर्तन महाशक्तीच्या अरुण सोनवणेंचा आ.ऋतुराज पाटील यांना पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अरुण सोनवणे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठींबा जाहिर केला आहे. आमदार सतेज पाटील म्हणजे विश्वासर्हता आणि विकासाची दुरदृष्टी असलेले  नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सोनवणे यांनी सांगीतले.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या कार्यपध्दतीवर प्रभावित होऊन त्यांना मतदारसंघातून विविध संघटनांचा वाढता पाठींबा मिळत आहे. ओबीसी जनमोर्चा, दलित पँथर, राष्ट्रीय बहुजन महासंघ, वंजारी समाज, माजी सैनिक संघटना, चर्मकार कल्याण फौंडेशन, संदीप म्हसवेकर प्रेमी ग्रुप शिंदे कॉलनी, सुर्वेनगरमधील विजय कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे उमेदवार आ.ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील  आघाडीच्या अन्य उमेदवारांना पाठींबा दिला.

कोल्हापूरातील सामाजिक वीण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेत यावे, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ऋतुराज संजय पाटील यांना पुन्हा निवडून देणार असल्याची भावना या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, नवीन उमेद व संकल्पना घेऊन आ.ऋतुराज पाटील दक्षिणच्या विकासासाठी काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण यासह विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय असे काम केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी राबणा-या नेतृत्वाला आपणां सर्वांची मिळालेली साथ स्वागतार्ह असून वाढत्या पाठींब्यामुळे आमदार ऋतुराज पाटील यांचा विजय निश्चित आहे. 

यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय सचिव दिगंबर लोहार, बबन रानगे, सुभाष देसाई, ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, शिवाजी माळकर, विजय घारे, मोहन हजारे, वंजारी समाज संघटनेचे दिपक सराटे, प्रकाश मुंडे, सुदर्शन जाधव, प्रकाश भांगे, माजी सैनिक संघटनेचे तानाजी चौगले, एकनाथ पाटील, हिंदुराव पाटील, साताप्पा कांबळे सुरेश संखगोंड, दयानंद कांबळे, प्रविण निगवेकर, दिपक कांबळे, वैजनाथ कांबळे, दीपक यादव, आनंदा कराडे, गोकुळ कांबळे, बहुजन महासंघाचे करवीर तालुका सरचिटणीस गोपाळ चौगुले, दत्तात्रय बामणेकर,  सुरज अवघडे, अभिषेक भुई, प्रकाश कांबळे, सुधाकर कांबळे, तानाजी गोंधळे आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.