सरसेनापतीच्या संचालक मंडळात कुटूंबाबाहेरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्यास उमेदवारी मागे घेतो - समरजितसिंह घाटगे

सरसेनापतीच्या संचालक मंडळात कुटूंबाबाहेरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्यास उमेदवारी मागे घेतो - समरजितसिंह घाटगे

बाचणी (प्रतिनिधी) : दीर्घ मुदत कर्ज म्हणजे काय? हे मुश्रीफ साहेब यांना चांगले माहित आहे. तरीही स्वार्थी राजकारण आणि दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या शाहू साखर कारखान्यावरील कर्जाबद्दल बोलणा-या हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे जाहीर करावीत.त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असेल तर त्या क्षणाला उमेदवारी मागे घेतो.कारखान्याचा वार्षिक अहवाल त्यांनी दाखविल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देतो.असे जाहीर आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

 बाचणी ता.कागल येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

 

घाटगे पुढे म्हणाले, शाहू कारखान्यावरील कर्जाबाबत माहिती त्यांना आम्हीच घरपोच केलेल्या वार्षिक अहवालावरून मिळाली आहे. मात्र त्यांच्या कारखान्याचा वार्षिक अहवालच कोणी पाहिलेला नाही. आमचा कारभार पारदर्शक आहे 'शाहू'चे संचालक मंडळ कधीही समोरासमोर येऊन याबाबत बोलू शकतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.आता हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर किती कर्ज आहे? हे सभासदांना माहित नाही.‌ कारण सभासदांनी अहवालच पाहिलेला नाही.

.... *याबाबत अद्याप ते काही बोलत नाहीत* 

  घाटगे म्हणाले,चाळीस हजार शेतकऱ्यांकडून मुश्रीफ साहेब यांनी शेअर्सपोटी पैसे घेतलेत. पण ते या कारखान्याचे सभासदच नाहीत. याबाबत अध्याप ते काही बोलत नाहीत.याचा जाब शेतकऱ्यांनी त्यांना विचारलाच पाहिजे

 बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांनी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे ,सदाशिवराव मंडलिक,बाबासाहेब कुपेकर, शामराव पाटील, श्रीपतराव शिंदे अशा रथी-महारथीना फसवले. मात्र ही मंडळी आज हयात नाहीत.आता त्यांनी ज्येष्ठ नेते व राजकारणातील वस्ताद असलेल्या शरद पवार यांना फसवले आहे. हा पठ्ठ्या अजून हयात आहे. त्यामुळे येत्या वीस तारखेला ते त्यांनी वस्तादाचा राखून ठेवलेला शेवटचा डाव दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

 *४० हजार कोटी,रुपयांचा हिशेब द्यावाच लागेल* 

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्स पोटी चाळीस हजार शेतकऱ्यांकडून त्यांनी पैसे घेतलेत पण ते या कारखान्याचे सभासदच नाहीत. या चाळीस हजार कोटी रुपयांचा हिशेब तुम्हाला शेतकऱ्यांना द्यावाच लागेल.असा इशारा समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी दिला.

यावेळी उत्तम पाटील,शिवानंद माळी,अश्विनी व्हरांबळे,अनिल पाटील, संतोष कांबळे, शकीला शहाणेदिवाण यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर शाहूचे माजी संचालक आर के पाटील,शाहूचे संचालक भाऊसो कांबळे,संजय पाटील,वसंत पाटील,सरपंच जयश्री पाटील, मारुती पाटील,शिवाजीराव कांबळे सागर कोंडेकर, सभांजीराव भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.