पळशिवणे गावची उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित करणार–आम.प्रकाश आबिटकर

पळशिवणे गावची उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित करणार–आम.प्रकाश आबिटकर

पिंपळगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील पळशिवणे गावासह परिसरातील शेतीसाठी वरदायिनी ठरणारी उपसा सिंचन योजनेसाठी 3 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते गावातील बाळुमामा मंदीराच्या पायाभरणी समारंभादरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, पळशिवणे गावासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीसाठी वरदायी ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेस निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर उपसा सिंचन योजना लवकर कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे बरेच क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे सांगितले. मतदार संघातील प्रत्येक गावांतील विकास कामांना कोट्यावधींचा निधी उपलब्ध केला असून यामुळे मतदार संघाचा कायापालट झाला असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही पळशिवणे गावास निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच वैजयंती कदम, उपसरपंच आर्चना कुराडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी जाधव, विजय पोवार, सातापा आमते, नरेंद्र सुतार, साधना गुरव, वैशाली कांबळे, जोतीराम चांदेकर, विजय सावंत, मारुती कदम, तंटामुक्ती आध्यक्ष नंदकुमार वर्देकर, सेवा सोसायटीचे चेअरमन नामदेव ढेकळे, सुनील चांदेकर, राजु आमते, निलेश रेडेकर, संतोष पोवार, सातापा हंचनाळे, प्रकाश जाधव, सचिन पोवार, दिपक पोवार, दयानंद पोवार, दता तिपे, एकनाथ देसाई, विश्वास कुराडे मारुती जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.